breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

बच्चा बडा हो गया ! सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर रोहित पवारांचे ट्विट

बारामती : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. बारामतीमध्ये पुन्हा लेकीने बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे यांचा भरघोस मतांनी विजय झाला असून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर , सुप्रिया सुळे यांच्या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे. त्यांचं हे ट्विट सध्या भलतंच चर्चेत आहे.

रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!

हेही वाचा – ओडिशात 24 वर्षानंतर पटनायक ‘राज’ संपुष्टात, भाजपचा दणदणीत विजय

बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय ✌️हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, #मविआ चे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “रोहित पवार बच्चा आहे”, अशी टिप्पणी केली. “रोहित पवार बच्चा आहे, बच्चाच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्ते, प्रवक्ते उत्तर देतील”, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीने काल छापे टाकले. ईडीने छापेमारी केली तेव्हा अजित पवार परदेशात होते. त्यानंतर ते आज मुंबईत दाखल झाले. त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद भूमिका मांडली. यावेळी त्यांनी या ईडी चौकशीवरुन अजित पवार गटाकडे बोट दाखवलं. “गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं? भाजपचं कोण गेलं होतं? आणि अजितदादा मित्र मंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं? त्यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येईल”, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी रोहित पवारांना बच्चा आहे, असा उल्लेख केला.

अखेर अजित पवार यांनी तेव्हा केलेल्या टीकेचा उल्लेख करत रोहित पवार यांनी अजित पवारांना ट्विटमधून प्रत्युत्तर दिलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button