breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय! संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता ‘या’ दलाकडे

नवी दिल्ली : संसेदेत दोन तरुणांनी केलेल्या घुसखोरीमुळे देशभरात खळबळ उडाली. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने संसद भवन परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) सोपवण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआयएसएफला संसद भवन संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता सीआयएसएफ आणि अग्निशमन दल मिळून संसद परिसरात अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यासाठी एक आराखडा तयार करतील. संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या सुरक्षा पथकासह सीआयएसएफ संसद भवन परिसराचं सर्वेक्षण करणार आहे.

हेही वाचा  –  ‘घटस्फोट हवा असल्यास पोपट परत कर’; पुण्यातील अजब प्रकरण, वाचा सविस्तर 

आठवडाभर अभ्यास करून सुरक्षेच्या दृष्टीने एक आराखडा तयार करून गृहमंत्रालयासमोर सादर केला जाईल. सीआयएसएफच्या जवानांबरोबर संसदेची सध्याची सुरक्षेची जबाबदारी पाहणारं पथक, दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचं पथक संयुक्तपणे संसद भवनाचं संरक्षण करतील.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (CISF) हे केंद्रीय सशस्त्र दल आहे. जे देशातील वेगवेगळ्या सरकारी संस्था, मंत्रालयांच्या इमारती, अणूऊर्जा प्रकल्प, अंतराळ संस्थेची ठिकाणं आणि विमानतळांना संरक्षण देतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button