breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली. आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अदयावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने या निवडणुकांची तयारी म्हणून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत मतदार म्हणून तुमची नोंदणी केली नसेल तर ती तातडीने करुन घ्या असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. २५ जूनपासून म्हणजेच येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. पोलींग स्टेशन्स, मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे. असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच निवडणूक आयोगाने महत्त्वाची बाब नमूद केली आहे.

हेही वाचा    –      OBCच शिष्टमंडळ शिंदे-फडणवीसांशी चर्चा करणार, लक्ष्मण हाकेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या? 

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाने राज्यांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button