‘मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान’; अशोक चव्हाणांची राज्यसभेत विरोधकांवर टीका

नवी दिल्ली | राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. यावेळी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी या चर्चेत सहभाग घेतला. सभापती जगदीप धनखड यांनी सुरूवातीला अशोक चव्हाण यांची ओळख करून दिली. ते लोकसभेचे सदस्य राहिले असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दोन वेळा आमदार राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी बोलण्यास सुरूवात केली. माझी संक्षिप्त ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान आहे, असं ते म्हणाले.
अशोक चव्हाण बरेच वर्षे काँग्रेसमध्ये होते. भाजपात गेल्यानंतर त्यांना तत्काळ राज्यसभेवर पाठवण्यात आलं. परंतु,अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वाखाली अनेक जागा भाजपाला गमवाव्या लागल्या असा दावा विरोधकांनी केला. त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. आमचे काही सदस्य इथं बोलत होते की इथे पराभव झाला, तिथे पराभव झाला. काही सदस्यांनी म्हटलंय की नांदेडमध्येही पराभव झाला. काही लोकंना नांदेडमध्ये प्रचंड रुची आहे. जेव्हा महाराष्ट्रात कुठेच जागा मिळाली नव्हती तेव्हा काँग्रेसला नांदेड आणि हिंगोलीत जागा मिळाली होती. त्या यशात माझा छोटासा वाटा होता.
हेही वाचा – ‘आज झाडे लावा, उद्या श्वास घ्या!’ लिटिल मिलेनियमचा उपक्रम
मी जे काही काम केलंय ते प्रामाणिकपणे केलंय. तिथून जागा निवडून आणल्या आहेत. काही सदस्य असेही आहेत ज्यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीचेही सदस्य निवडून आले नाहीत. त्यामुळे मला आता इकचं म्हणायचं आहे की, जित पर कभी अहंकार नहीं किया, किसी हारपर कभी रोया नही लेकिन हर हारके बात कभी चैनसे बैठा नही! असंही अशोक चव्हाण म्हणाले.