Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २२ जागा? वाचा संपूर्ण यादी
![Thackeray group won 22 seats in Mahavikas Aghadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Mahavikas-Aghadi-1-780x470.jpg)
पुणे | लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. अखेर ठाकरे गटाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाला २२ जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत २२ जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत देखील निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे. असे असतांना २२ पैकी ४ अशा जागा आहेत, जिथे कोणता उमेदवार द्यायचा याबाबत निर्णय झाला नाही. ज्यात जळगाव, कल्याण, पालघर, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
संभाव्य उमेदवारी निश्चित झालेले मतदार संघ
- बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ वाशीम – संजय देशमुख
- हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
- परभणी – संजय जाधव
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची कारवाई, सहा राज्यांचे गृहसचिव हटवण्याचे आदेश!
- छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
- धाराशिव – ओमराजे निंबाळकर
- शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
- नाशिक – विजय करंजकर
- ठाणे – राजन विचारे
- मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील
- मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
- मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
- मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तिकर
- रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
- रायगड – आनंद गीते
- सांगली – चंद्रहार पाटील
- हातकणंगले – राजू शेट्टी – स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा
- मावळ – संजोग वाघेरे.