ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘ठाकरे गटानं भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा’; संजय निरूपम

नवीन शिवसैनिक आहेत, यासोबत जे नवीन मतदार आहेत ते फक्त मुस्लिम समाजाचे

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा, असं ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते. तर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. तर एकनाथ शिंदे यांनी अदानी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं, अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली. तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटानं भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, असा खोचक टोला संजय निरूपम यांनी लगावला आहे.

पुढे ते असेही म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतच होईल. पण उबाठामध्ये जे सुरू आहे त्यावरून त्यांचा दसरा मेळावा यंदा भेंडीबाजारमध्ये व्हायला हवा. कारण त्यांच्याकडे जे समर्थक आहेत, नवीन शिवसैनिक आहेत, यासोबत जे नवीन मतदार आहेत ते फक्त मुस्लिम समाजाचे राहिले आहेत. त्यामुळे भेंडीबाजारमध्ये ठाकरे गटाचा दसरा मेळावा झाला तर तो यशस्वी होईल, असा घणाघात संजय निरूपम यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button