breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“आदित्यला वेड्याच्या रुग्णालयात भरती करा”; तानाजी सावंत यांची आदित्य ठाकरेंवर टीका

मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले होते

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिलं होतं. हिंमत असेल तर वरळीतून माझ्याविरोधात लढा असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्या ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कोठे जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ली मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सेवाभाव वृत्ती आहे. कोरोना काळात त्यांनी जगाचा विचार केला. बाहेरच्या देशांना लसी पुरविल्या. असा नेता भारताला लाभला. आपल्या देशात रोजप्रतिकारशक्ती बऱ्यापैकी आहे. त्यामुळं फारसा परिणाम झाला नाही. पण, काही देशांतील ७० टक्के जनता कोरोनाने प्रभवित झाली होती. वैराग्याचं लक्षण हे महादेवाचं लक्षण असल्याचंही आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले.

२०१९ साली मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले होते. माझ्यावर अन्याय का करण्यात आला, याचे मला उत्तर द्या, असा जाब मी मातोश्रीवर जाऊन विचारला होता. तसेच माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नसाल, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, असंही मी तेव्हा म्हणालो होतो, असं तानाजी सावंत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button