breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

सर्व्हेत घोळ, की फक्त कल्लोळ?, सोशल मीडियात आकड्यांच्या गणितावर प्रश्न

मुंबई : अंदाजांच्या आकड्यांवरुन गदारोळ सुरु झालाय. काही नेटकऱ्यांनी सर्व्हेच्या आकड्यांवर शंका व्यक्त केलीय. तर सर्व्हेच्या गणितावर विरोधकांनी सवाल केलेयत. अॅक्सिस माय इंडियाच्या सर्व्हे सोशल मीडियात चर्चेत आहे. नेमका काय आक्षेप घेतला जातोय. ते पाहण्याआधी आकडे जाणून घ्या.

अॅक्सिस माय इंडिया सर्व्हेनं महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22, काँग्रेसला 3 ते 4, शिंदेंना 8 ते 10, ठाकरेंना ९ ते ११, अजित पवार गटाला १ ते २ आणि शरद पवार गटाला 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. यातला प्रमुख आक्षेप शिंदे आणि ठाकरेंना मिळालेल्या जागांवर वर्तवला जातोय. कारण शिंदे एकूण 15 जागा लढवतायत., त्यापैकी 13 ठिकाणी शिंदेंचा मुकाबला ठाकरेंशी आहे. त्यामुळे ज शिंदे १० जागा जिंकणार असतील., तर मग ठाकरेंच्या ११ जागा कुठून येणार? हा सवाल नेटकऱ्यांसह विरोधकांनी उपस्थित केलाय.

महाराष्ट्रात एकूण जागा 48 आहेत. त्यापैकी 13 जागांवर शिंदे विरुद्द ठाकरे, 5 जागांवर भाजप विरुद्ध ठाकरे, 8 जागांवर शरद पवारांचे उमेदवार विरुद्ध भाजप, 15 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप, 2 जागांवर शरद पवार विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार, 2 जागांवर शिंदे गट विरुद्ध काँग्रेसमध्ये लढत झालीय. 2 जागांवर ठाकरे विरुद्ध अजितदादांचे उमेदवार आणि एका जागेवर ठाकरे विरुद्ध रासपमध्ये लढत आहे.

सर्व्हेचा अंदाज असा आहे की भाजपला 20 ते 22, शिंदेंना 8 ते 10, ठाकरेंना 9 ते 11, अजितदादांना 1 ते 2, शरद पवारांना 3 ते 5 आणि काँग्रेसला 3 ते 4 जागा मिळतील. मात्र शिंदेंच्या 15 पैकी १३ जागांवर ठाकरे असतील., तर ठाकरेंना 9 ते 11 जागा कुठून येतायत. जर शरद पवारांना 3 ते 5 जागांचा अंदाज असेल, तर त्या कुठून येतायत. आणि जर हा अंदाज खरा असेल तर भाजपला 20 ते 22 कुठून आल्या., असे अनेक तर्क-वितर्क लढवले जातायत.

हेही वाचा   –  ‘तंत्रज्ञानस्नेही उपक्रमांचा महापालिकेच्या करसंकलनामध्ये मोलाचा वाटा’; आयुक्त शेखर सिंह 

आकड्यांवरचा दुसरा आक्षेप म्हणजे बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष लोजपा एकूण ५ जागा लढवतोय. मात्र सर्व्हेंमध्ये लोजपा ४ ते ६ जागांवर विजय होण्याचा अंदाज आहे., पण जो पक्ष मुळात ५ जागा लढवतोय. तो ६ जागांवर कसा जिंकणार., असा प्रश्न विचारला जातोय. जितेंद्र आव्हाडांनी एका सर्व्हेचा फोटो ट्विट करत म्हटलंय की., हिमाचलमध्ये एकूण लोकसभेच्या जागा चारच असताना त्याठिकाणी भाजप 6 ते ८ जागांवर कसं काय जिंकू शकतं?

एकीकडे भाजप आणि एनडीएच्या नेत्यांना पुन्हा भाजप स्वबळावर सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकत असल्याचा दावा काँग्रेस करतेय. काल एका बाजूला सर्व्हे वृत्तवाहिन्यांवर झळकत असताना दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली. दाव्यानुसार या बैठकीत सर्व राज्यातल्या गणितांवर चर्चा झाल्यानंतर विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

सपाच्या अखिलेश यादवांनी आवाहन केलंय की. भाजपला ३०० जागांचा अंदाज पूर्णपणे खोटा आहे. प्रत्यक्षात इंडिया आघाडीचं सरकार बनतंय. भाजप हे खोट पसरवून मनोबल कमी करु पाहतंय. ज्यामुळे मतमोजणीच्या दिवशी तुम्ही गाफिल राहून काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सोबतीनं भाजप गोंधळ करु शकतं. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी सतर्क राहा. तूर्तास सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप 18, ठाकरे 14, शरद पवार गट 06, काँग्रेस 05, शिंदे गट 04 तर अपक्षांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार जर निवडणूक आधी आणि अंदाजानंतरचं चित्र पाहिल्यास नफा-नुकसानीचं गणित काय सांगतंय.

2019 ला भाजपचे 23 खासदार होते, अंदाजानुसार यंदा 18 मिळाल्यास भाजपला 5 जागांचं नुकसान होऊ शकतं. शिवसेना फुटीनंतर ठाकरेंकडे 5 खासदार होते. अंदाजानुसार त्यांना जागा मिळाल्यास 9 जागांचा फायदा शिंदेंकडे 13 खासदार आहेत. अंदाजानुसार जागा मिळाल्यास 9 जागांचा तोटा. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांकडे 1 खासदार आहेत. अंदाजानुसार 1 जागेचं नुकसान शरद पवारांकडे 3 खासदार, अंदाजानुसार यंदा त्यांना 3 जागांचा फायदा. काँग्रेसकडे 1 खासदार होते. यंदा त्यांना 4 जागांचा फायदा होऊ शकतो. तूर्तास हे सारे अंदाज आहेत. प्रत्यक्ष निकालासाठी घोडामैदान दूर नाही. मात्र सर्व्हेंच्या आकड्यांवरुन दोन्ही बाजूनं गदारोळ रंगलाय.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button