गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या..
![Supriya Sule said whether it was right to insult Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Supriya-Sule-780x470.jpg)
पुणे : अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, असं विधान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत आहेत. सत्तेत असताना अजित पवार यांचा मित्रपक्ष त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करतो, हे अतिशय वाईट आहे. भाजपानं मोठ्या मनानं अजित पवारांना सत्तेत बरोबर घेतलं. पण, अजित पवारांचा अपमान करण्यासाठी बरोबर घेतलं का? याचं उत्तर भाजपानं दिलं पाहिजे. मित्रपक्षाबद्दल बोलण्याची ही कुठली पद्धत आहे. हे दुर्दैवी आहे. हा अजित पवारांचा अपमान आहे.
हेही वाचा – ‘इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी शिवसेनेचाही हातभार’; इरफानभाई सय्यद
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.