breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

राहुल गांधी यांना सर्वेच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, खासदारकीही परत मिळणार

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा – देशातील ‘या’ क्षेत्रात लवकरच १० कोटींहून अधिक नोकऱ्या होणार उपलब्ध!

सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? त्यापेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button