मावळ विधानसभेवर भाजपचा दावा, आमदार सुनील शेळके नाराज; म्हणाले..
![Sunil Shelke said that we have decided to follow the religion of Mahayuti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sunil-Shelke-780x470.jpg)
पुणे | माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेवर दावा केला आहे. त्यामुळे मावळ विधानसभेत महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं शंभर टक्के प्रमाणिक काम केलं. परंतु, त्यांच्यावर कोणी शंका घेत असेल आणि आम्हाला जागा मिळावी म्हणून आग्रह करत असेल तर योग्य नाही. शेवटी महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.
हेही वाचा – Paris Olympic 2024 | मनू भाकेरने इतिहास रचला, भारताच्या खात्यात दुसरं ऑलिम्पिक पदक
महायुतीचा धर्म पाळायचा अस आम्ही ठरवलं आहे. मी भाजपच्या संघ आणि जनसंघातून वाढलेला नेता आहे. त्यामुळे मला पक्षाचा आदेश समजतो वेगळं काही घडलंच तर युतीचा धर्म पाळणे माझ्यासाठी क्रमप्रप्त असेल. अजित पवारांना कधीच सोडणार नाही. कारण, अजित पवारांनी मला काही कमी पडू दिलं नाही. जे विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं सुनील शेळके म्हणाले.