मोठी बातमी : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होणार?
आज दुपारी उमेदवारी अर्ज भरणार : पक्षाकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब
पुणे | राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू होती. अशातच आता राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
हेही वाचा – ‘पराभवाचे खापर आमच्यावर नको’; ऑर्गनायझरमधील लेखावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आजच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.