breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“वहिनी..! बघा यंदा तुम्हीच खासदार होणार”, सुनेत्रा पवारांनी भोरमध्ये साधला महिलांशी संवाद

पुणे | महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल भोर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी भोर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते, तसेच पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी  भोर तालुक्यातील चिखलावडे बुद्रुक गावातील शेतकरी महिला व पुरुषांनी त्यांना वन्य प्राण्यांकडून होणारा त्रास कळवळून सांगितला. मोठ्या कष्टाने, घाम गाळून शेतात रुजवलेले, जोपासलेले पीक क्षणात होत्याचे नव्हते करण्याचे काम होत आहे. याबाबत वन्य विभाग आणि अन्य पातळीवर उपाययोजना करन्यासाठी नक्की प्रयत्न करेन, अशी सुनेत्रा पवार यांनी नागरीकांना ग्वाही  दिली. त्याचबरोबर यावेळी या परिसरात राष्ट्रवादीच्या, महायुतीच्या माध्यमातून झालेल्या, होत असलेल्या विकासकामांची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

यातच सुनेत्रा पवार यांनी भोर तालुक्यातील चिखलावडे खुर्द गावाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी गावकऱ्यांनी औक्षण करत म्हणाले की, तुम्हीच खासदार होणार बघा. तर नांटबी गावात गेल्या असता गावकऱ्यांनी मोठ्या आनंदात स्वागत केले. मात्र नाझरे गावात सुनेत्रा पवार यांना वेगळाच अनुभव आला. त्याठिकाणी काही महिलांशी संवाद साधला असता. त्या म्हणाल्या की, खास तुम्हाला भेटायला सगळी काम सोडून आम्ही साऱ्याजणी आलो आहे. पेपरात, टिव्हीत तुम्हाला पाहताना तुम्ही आम्हाला आमच्याच वाटता. असेही त्यांनी म्हटले. तसेच या ठिकाणी झालेल्या भाषणांमध्ये स्थानिकांनी, झालेला विकास हा महायुतीच्या माध्यमातूनच झाला असल्याचे सांगून हे गाव घड्याळालाच मताधिक्य देईल अशी ग्वाही त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी  दिली.

हेही वाचा      –      निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदान कार्ड नसले तरी देखील मतदान करता येणार 

त्यानंतर शंभूतीर्थ, पान्हवळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या ठिकाणी विशेषतः महिला भगिनींचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पवार यांना विशेष भावला. स्थानिकांसह विविध पदाधिकारी मनोगत व्यक्त करत असताना उपस्थित माता-भगिनींपैकी एक चंद्रभागा कोंढाळकर यांनी तर स्वतःहून पुढे येऊन माइक हाती घेतला. आणि जोशात बोलल्या, “तुम्ही माझ्या लेकी सारख्या आहात. पण तुम्हाला सगळेच वहिनी म्हणतात म्हणून मीही म्हणते. वहिनी, आम्हा सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमचा विजय घोषित झालेला आहे.

भोर तालुक्यातील कर्णावड गावाला भेट दिली असता या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ सुरेश कुडपने, तुकाराम पालवे, प्रकाश राजीवडे, संजय काशीद, राजू घिरे, बापू आंबोले, दत्तात्रय नांगरे, नाथाभाऊ शिंगारे, बाळासाहेब घावले, शामराव आंबोले, रामचंद्र मोरे, दादा सदांबर, बाळासाहेब कुडपणे, शिवाजी कुडपणे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी आम्हा सर्वांचे स्वागत केले. सन्मान केला. घड्याळाचा गजर करून महायुतीच्या मताधिक्क्याचा निर्धारही त्यांनी केला.

डोंगर कुशीतील टिटेघर सारख्या छोट्या गावातील महिलांकडे इतके कौशल्य आहे, की त्यांनी विणलेल्या गोधड्या थेट अमेरिका, युरोपमधील विविध देशात विकल्या गेल्या आहेत. मात्र काही अडचणी आल्या आणि त्यांचे हे काम थांबले. माझ्या महिला सक्षमीकरणाच्या कामातील अनुभवाच्या बळावर टिटेघरची गोधडी पुन्हा एकदा परदेशात पोहोचवण्यासोबत तिला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button