breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘संभाजी भिडेंना अटक करा, नाहीतर हत्या करेन’; माजी राज्यमंत्र्याची धमकी

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. यानंतर त्यांच्यावर विरोधक सडकून टीका केली जात आहे. तसेच राज्यभरात संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सुबोध सावजी म्हणाले की, श्री मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांचेवर कडक कारवाई होणेबाबत अन्यथा माझे हातून यांचा मर्डर झाल्यास कारणीभूत आपण, आपण राज्याचे गृहमंत्री या अधिकारात आपणाकडे राज्यातील जनतेच्या वतीने मागणी करण्यात येते की श्री मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे सापडलेले बेवारस अभ्रक यांनी अलीकडच्या काळात विदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, देशाची अस्मिता तिरंगा झेंडा आणि देशाचा स्वाभिमानाचा दिवस १५ ऑगस्ट आदि लोकनेते आणि देवदेनतांबद्दल जी अपमानाजनक, गलीच्छ, प्रेक्षोभक विधाने केले याबद्दल यांना त्वरीत अटक करून स्थानबद्ध करून कठोर कारवाई करावी. आपण असे न केल्यास राज्यातील जनतेच्या वतीने मी यांचा मर्डर करेल यांची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याचाच अर्थ माझ्या या कृत्यास कारणीभूत असाल, असं सुबोध सावजी यांनी म्हटलं आहे. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button