breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सोलापुरात अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा आगीत भस्मसात

सोलापूर |

सोलापुरात होम मैदानावर रिलायन्स कंपनीने साठा करून ठेवलेल्या अ‍ॅप्टिकल केबलला अचानकपणे आग लागून संपूर्ण केबलचा साठा जळून भस्मसात झाला. आगीचे कारण लगेचच समजू शकले नाही. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आगीची घटना समजताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेने त्वरित धाव घेऊन पाणी व रासायनिक द्रव्यांचा फवारा करून आग आटोक्यात आणली.होम मैदानावर जेथे अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा ठेवण्यात आला होता, तेथे खेटूनच रहिमतबी झोपडपट्टी आहे.

सुदैवाने आगीची झळ झोपडपट्टीला बसली नाही.शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रिलायन्स कंपनीकडून अ‍ॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी होम मैदानावर अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा मोठा साठा करू ठेवण्यात आला होता. परंतु दुपारी अचानकपणे या केबलला आग लागल्याचे दिसून आले. आग लागून धुराचे लोट उंचावर पसरले होते. अ‍ॅप्टिकल फायबर केबल असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.

दरम्यान, या आगीची माहिती महापालिका अग्निशामक दलाला कळताच तेथे पाण्याचे बंब धावून आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन पाण्याचे बंब आणि फोम नावाचे रासायनिक द्रव्य वापरून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा एकत्र चिकटून ठेवण्यात आल्यामुळे आगीत मोठे नुकसान झाले. मात्र नुकसानीचा आकडा समजला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button