भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मैदानात
![State president Chandrasekhar Bawankule for the candidate of the BJP grand alliance, Ashwini Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Chandrakant-Bawankule-Pimpri-Chinchwad-780x470.jpg)
पिंपरी: चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरले आहेत. आज (दि.१६) संपूर्ण दिवसभर सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बावनकुळे हे मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
आज सकाळी त्यांनी रहाटणी शिवराज नगर येथील प्रमुख सोसायटीच्या रहिवासी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर चिंचवड विधानसभा बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांचा मेळावा रहाटणीतील कापसे बँक्वेट हॉल येथे साडेअकरा वाजता संपन्न होणार आहे. युवक व नवीन मतदारांची बैठक पिंपळे सौदागर येथील बर्डव्हॅली हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता आकुर्डी येथील हॉटेल ग्रँड एक्झोटीका येथे चिंचवड विधानसभा क्षेत्रातील 13 प्रभागातील प्रमुख व प्रभारी यांची बैठक पार पडणार आहे.
त्यानंतर सायंकाळी चार वाजता चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 18 मधील किवोटर्स सोबत चर्चा करणार आहेत. तसेच केवळ किवळे प्रभागातील नागरिकांसोबत दुपारी पावणे पाच वाजता इंद्रप्रभा सोसायटी विकासनगर किवळे येथे बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता प्रभाग क्रमांक 32 मधील विविध समाज प्रमुखांच्या सोबत त्यांची बैठक सांगवीतील बालाजी लॉन्स येथे पार पडणार आहे.
सायंकाळी सव्वा सहा वाजता बावनकुळे यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील चैतन्य सभागृहात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता उच्चशिक्षित रहिवाशांची बैठक वाकड येथील कल्पतरू सोसायटी तसेच संस्कृती सोसायटी येथे घेण्यात येणार आहे. रात्री नऊ वाजता प्रभाग क्रमांक 17 विजयनगर येथे लेवा पाटीदार समाजातील नागरिकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.