#SSRCase: ‘ते’ नमुने का घेतले नाही? सुशांत सिंह राजपूत प्रकरणी AIIMS हॉस्पिटलचा थेट सवाल
![Actor Sushant Singh Rajput's death: Assistant director Hrishikesh Pawar summoned for questioning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Sushant-Singh-Rajput_172fb565f8b_medium.jpg)
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. पण, या तपासात गेल्या चार महिन्यानंतर एक नवीन धक्कादायक खुलासा झालेला आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलने आता मुंबई पालिकेच्या रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला होता. पण, त्यावेळी यूरीन नुमने घेतले नसल्याचे समोर आलेले आहे.
जर सूशांतचे यूरीन नमुने घेतले असते तर आत्महत्येआधी त्याने ड्रग्स घेतले असते तर समोर आले असते. त्याच्या यूरीन नुमन्यामुळे जर त्याने खरच ड्रग्स घेतलेले असेल तर त्याचे किती प्रमाण होते, हे स्पष्ट झाले असते. त्यामुळे यूरीन नमुन्यावर AIIMS ने प्रश्न उपस्थितीत केले आहे. परंतु, आत्महत्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा यूरीन नमुने हे घेतले जात नाही, असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे.