Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

कुडाळात ‘राजकीय’ भूकंप: सोमनाथदादा कदम यांचा युवाशक्तीसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचे 'कमळ' हाती; जावळीचे राजकीय समीकरण बदलणार

सातारा | प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. कुडाळचे उपसरपंच सोमनाथदादा कदम आणि महेश कदम यांनी आपल्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांसह आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

विकासासाठी उचललेले पाऊल: सोमनाथ कदम

पक्षप्रवेशानंतर आपली भूमिका मांडताना सोमनाथदादा कदम म्हणाले की, “आम्ही केवळ आणि केवळ विकासाच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे. आमच्या भागाचा प्रलंबित विकास आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी गटासोबत राहणे काळाची गरज आहे. हा प्रवेश आमच्या भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचा ठरेल.” तसेच, या प्रवेशामुळे कुडाळ गटातील संपूर्ण राजकीय गणिते आता बदलणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विरोधी भूमिका सोडा, विकासासाठी एकत्र या – शिवेंद्रराजे भोसले

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी नूतन सदस्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, “राजकारण करत असताना नेहमीच विरोधी भूमिका न ठेवता, सत्तेत एकत्र राहून काम केल्यास विकासाचा वेग वाढतो. आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर सर्वांनी विकासभिमुख दृष्टिकोन ठेवून काम केले पाहिजे.” शिवेंद्रराजेंनी यावेळी उपस्थित समस्त कार्यकर्त्यांना जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

हेही वाचा     :            शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अजित पवारांना श्रद्धांजली!

ज्येष्ठ आणि युवकांचा अभूतपूर्व उत्साह..

या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केवळ तरुणांचाच मोठा सहभाग नव्हता, तर ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निर्णयाला पाठिंबा दिला. यामध्ये नामदेव कदम, मोहन कदम, कृष्णात पवार, शंकर पवार, राजेंद्र शिंदे, रामदास कदम, उत्तम कदम, हनुमान शिंदे, आत्माराम चौधरी, मुरलीधर कदम, नथुराम पाटील, नवले बंधू, विक्रम शेळके, संदीप आबा पवार, विकी पवार, किरण कदम, विक्रम कदम, आकाश शेवते, गणेश कदम, हनुमंत कदम, सुनील दादा पवार, संभाजी मोरे, दिलीप पवार, रवींद्र पवार, संतोष पवार, किरण पवार, यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते.

​राजकारण हे समाजकारणाचे साधन आहे आणि जेव्हा विकासाचा प्रश्न येतो, तेव्हा हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असते. सोमनाथदादा कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासाची ध्येयधोरणे स्वीकारून आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. कुडाळ भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सत्तेच्या माध्यमातून विकासकामांचा निधी थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता आमची ही भक्कम फळी अधिक वेगाने काम करेल.

– शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री.

​भागाच्या विकासासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे नेतृत्व सक्षम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ परिसराचा कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वजण जोमाने कामाला लागू.

– नथुराम चौधरी (पाटील) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button