breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दहशत पसरवण्यासाठी सुशील कुमारने हत्येदरम्यान केलं होतं असं काही; पोलिसांची धक्कादायक माहिती

नवी दिल्ली |

ऑलिम्पिक विजेता राहिलेल्या सुशील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. युवा कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येप्रकरणी २० दिवसांपासून फरार असलेल्या सुशील कुमारला अखेर पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. कोर्टात हजर करण्यात आलं असता सुशील कुमारला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी सुशील कुमारने हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “सुशील कुमारने आपला मित्र प्रिन्सला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं होतं. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितांना जनावरांप्रमाणे मारहाण केली. त्याला कुस्ती क्षेत्रात आपली दहशत निर्माण करायची होती,” अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर राणा आणि त्याच्या दोन मित्रांनी ४ मे रोजी राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये बेदम मारहाण केली होती. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर फरार असलेल्या सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याशिवाय अजय कुमारच्या अटकेसाठी ५० हजारांचं बक्षीस जाहीर झालं होतं. ३७ वर्षीय सुशील कुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली तसंच शेजारच्या अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते. १८ मे रोजी सुशील कुमारने दिल्ली कोर्टात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. तपास एकतर्फी असून पीडितला झालेल्या दुखापतीशी आपला संबंध नसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र कोर्टाने प्रथमदर्शी मुख्य आरोपी असून गंभीर आरोप असल्याचं सांगत अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक तर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं.

वाचा- भारतात आढळलेल्या विषाणू उत्परिवर्तनाबाबत अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस प्रभावी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button