गरजूंना मिळणार कौशल्यही आन कामही ! पिं.चिं महापालिका व लाईटहाऊस देणार संधी
![Skills and work will be given to the needy! Opportunity to provide Pinchin Municipal Corporation and Lighthouse](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/5cfa7dcf-cfa0-493d-80ba-2203957c408f.jpg)
पिंपरी ।प्रतिनिधी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात अनेकांचे रोजगार गेले असून सामाजिक, आर्थिक घडी विस्कटली आहे. या पार्श्वभूमीवर लाईटहाऊस कम्युनिटिज फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड महानगपालिका व अटलाज कॉर्पो यांच्या विद्यमाने तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी खुल्या करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून ४० पेक्षा जास्त कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम मोफत शिकवले जाणार असून त्याद्वारे रोजगार व नोकरी मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्शिअल अकाउंटिंग विथ टॅली, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलोपमेंट, ग्राफिक डिजाईन, मोबाईल रिपेअर, जावा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, फायथोन, फुल स्टॅक डेव्हलपर, क्लाऊड कॉम्पुटिंग, रिटेल- सेल्स, कॉम्पुटर हार्डवेअर नेटवर्किंग अँड मोबाईल, लॅपटॉप रिपेरिंग, नर्सिंग, एसी रिपेरिंग. होम अँप्लिकेशन रिपेरिंग, फॅशन डिजाईन, ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट आदी कोर्स यामध्ये शिकवले जाणार आहेत. विनामूल्य प्रवेश, प्रमाणपत्र व नोकरीची हमी हे या कोर्सची वैशिष्टये आहेत. तसेच यापूर्वी लाईटहाउस मधून कोर्से केलेल्या किंवा करत असणाऱ्यांना यामध्ये सहभाग घेता येणार नाही. सहभाग घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ३० दरम्यान असावे तसेच कमी उत्पन्न गटातील असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी यामध्ये सहभाग नोंदवावा तसेच अधिकाधिक गरजूंपर्यंत ही माहिती पोहचवावी असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
इथे करा संपर्क…
याबाबत अधिक माहिती हवी असल्यास तसेच चौकशीसाठी ८०८०९३६०६० या क्रमांकावर संपर्क करावा किंवा दुसरा मजला , क्रांती ज्योती सावित्री फुले स्मारक, कामगार भवन जवळ, नेहरू नगर रोड, आंबेडकर चौक, मुंबई – पुणे हायवे, पिंपरी येथे लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या कार्यालयाला भेट द्यावी. तसेच https://forms.gle/X945N69aWbiqjfNq8 या लिंकवर फॉर्म भरून प्रवेश घेता येणार आहे.