breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

श्रावण हर्डीकर पुणे महापालिकेचे नवे आयुक्त!

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्रात आज ४४ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या नावाचा समावेश नाही. मात्र पुणे महापालिकेला लवकरच नवा आयुक्त मिळणार असल्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यापूर्वी आयुक्त असलेले आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचे सध्याचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रावण हर्डीकर यांना पुणे महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हर्डीकर यांच्या नावाला सहमती दर्शवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी महाईन्यूजला दिली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. गणेशोत्सवानंतर विक्रम कुमार काही दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्याने बदली निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. मात्र काही दिवसांनी ते पालिकेत कामावर रुजू झाल्यानंतर कुमार यांच्या बदलीला विलंब होत असल्याची चर्चा सुरू झाली. सरकारने आज रात्री उशिरा राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र त्यात विक्रम कुमार आणि हर्डीकर यांच्या नावाचा समावेश नाही. मात्र, पुणे पालिकेच्या आयुक्तपदासाठी हर्डीकर यांचे नाव निश्चित झाले असून, लवकरच याबाबतचा आदेश निघणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button