Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) बारामतीची पोटनिवडणूक लढणार नाही; शशिकांत शिंदेंची माहिती

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बारामती आणि राहुरी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नाही. २८ जानेवारी रोजी अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला होता. बारामती येथे त्यांचे विमान कोसळून हा दुर्दैवी अपघात घडला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामती येथे २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत आम्ही अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. राहुरीच्या बाबतीत आम्ही चर्चा केली आहे. राहुरीबाबत महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहोत. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हाच आम्ही निर्णय जाहीर केला होता की बारामतीची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढवणार नाही.

हेही वाचा       :              राज्यात पावसाचा जोर कमी; काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राहुरीच्या संदर्भात आम्ही मविआच्या नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. बाळासाहेब थोरात यांच्याशी, हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करु, शिवसेनेशी चर्चा करु त्यानंतर निर्णय घेऊ. प्राजक्त तनपुरे यांच्याशीही आमची चर्चा झाली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. आम्ही चर्चा करुन राहुरीबाबतचा काय तो निर्णय घेऊ, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

अशोक खरात प्रकरण, सीडीआर, व्हिडीओ क्लिप या संदर्भात हे कुणाला लक्ष्य ठेवून केलं आहे की कारवाई संदर्भातलं आहे अशी शक्यता व्यक्त केली होती. अंजली दमानियांकडे सीडीआर कुणी जाणीवपूर्वक पाठवले असतील तर त्याबाबत पोलिसांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. अशा प्रकारचे सीडीआर बाहेर जातात कसे? याबाबत शंका उपस्थित होते आहे. त्यामुळे सरकारने आता याबाबत खुलासा केला पाहिजे असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button