पृथ्वीराज चव्हाणांची कॅटीगरी काय? शरद पवारांचा पलटवार
![Sharad Pawar said what is the category of Prithviraj Chavan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/prithviraj-chavan-and-Sharad-Pawar-780x470.jpg)
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी ही भाजपची टीम बी आहे, अशी टीका केली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते A आहे की B,C किंवा D आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहेत ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार.
हेही वाचा – Pune : सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरोधात ईडीची कारवाई
कर्नाटक विधानसभा प्रचारावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचं पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, अशी टीका केली होती. यावर शरद पवार म्हणाले की, काही लोकाचं वैशिष्ट्य असं की काही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करायचा.
सामनातील अग्रलेखावर शरद पवार म्हणाले की, आपला पक्ष पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. आम्ही काय करतो, त्यात आम्हाला समाधान आहे, ते लिहीतील त्यांना लिहायला अधिकार आहे. आमच्या दृष्टीने त्याला महत्व नाही, असंही ते म्हणाले.