‘अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचं मोठं विधान
काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही - शरद पवार
![Sharad Pawar said that many regional parties can merge with Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Sharad-Pawar-780x470.jpg)
मुंबई | काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ठ्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरू यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
शरद पवार म्हणाले की, देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार यांनी आता एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात धक्कादायक दावे केले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने त्यांनी केली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील.
हेही वाचा – अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोन्याच्या किंमती वाढल्या; जाणून घ्या आजचे दर
शरद पवार यांना हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणी मी पाहिली आहे. ती आमच्यासारखीच आहे. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहे. परिस्थिती १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा राहुल गांधी यांना आहे, असंही शरद पवार म्हणाले.