‘मी पुन्हा येईन’वरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला; म्हणाले..
![Sharad Pawar said that Fadnavis came again, but not as Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/devendra-fadnavis-and-Sharad-Pawar-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोलाही लगावला. फडणवीस पुन्हा आले, पण मुख्यमंत्री म्हणून नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला.
शरद पवार म्हणाले, माझं वय झालं म्हणायला तुम्ही माझं काय बघितलं. तुम्हाला सत्तेच्या बाजूला जायचं तर जा. पण ज्यांच्या जिवावर तुम्ही निवडून आलात, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवा. पण ते नाही केलं, लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. भाजपाचा पराभव केला. त्यांचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज भाजपाच्या दावणीला बसायची भूमिका तुम्ही मांडत आहात. उद्या मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल, तेव्हा कोणतं बटण दाखवायचं आणि तुम्हाला कुठे पाठवायचं हा विचार मतदार केल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा – आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पोदार स्कूलचे यश
Beed, Maharashtra | NCP chief Sharad Pawar says, "On 15th August, PM Modi said 'Mi Punha Yein' (I’ll come back again) I want to tell him a similar thing was said by Maharashtra's former CM Devendra Fadnavis & he came to power but at a lower post." pic.twitter.com/MecIn1hxJ9
— ANI (@ANI) August 17, 2023
पंतप्रधान लाल किल्ल्यावरून म्हणाले मी पुन्हा येईन. माझी त्यांना विनंती आहे. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. तेही म्हणाले होते मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं आहे की मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घ्या. फडणवीस पुन्हा आले, पण मुख्यमंत्री म्हणून नाही, खालच्या पदावर. आता पंतप्रधान म्हणाले मी पुन्हा येईन. मग आज आहे त्याच्या खालच्या कुठल्या पदावर यायचंय, याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका, असंही शरद पवार म्हणाले.