‘..तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?’; शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
![Sharad Pawar said if Uddhav Thackeray had become the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/sharad-pawar-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली
पिंपरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मान्यता होती, असा गौप्यस्फोट केला. या सगळ्यावर शरद पवार यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत आहेत. मात्र आता पहाटेचा शपथविधी झाल्यामुळे एकच चांगलं झालं राष्ट्रती राजवट उठली, असं म्हटलं आहे. पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाच पुन्हा चर्चांना उधान आलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीने सरकार बदलण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा एकच फायदा झाला तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठवली गेली. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला होता. पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असं ते म्हणाले. पण नंतर त्यांनी धोका दिला. एवढचं नाही जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.