भेटी मागे दडलंय काय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांनी घेतली दिल्लीमध्ये भेट!
राजकीय चर्चेला उधाण : महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Narendra-Modi-and-Sharad-Pawar-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे बुधवारी दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संसद होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली ही भेट राजकीय नसल्याचे सांगत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची जी चर्चा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुरू झाली आहे त्या दृष्टीने शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट महत्वपूर्ण ठरेल का याची चर्चा चांगली सुरू झाली आहे.
दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले आहे शेतीच्या विषयाशी संबंधित ही भेट होती पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नवीन समीकरण जुळतील असे चित्र दिसू लागले आहे 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केले त्यानंतर त्यांच्यापासून दुरावलेले त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू झाली म्हणूनच आजची शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महत्वपूर्ण ठरत आहे.
हेही वाचा – संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
शरद पवार आज पंतप्रधान मोदी यांना भेटले त्यावेळी सातारा आणि फलटणचे दोन डाळींब उत्पादक शेतकरी त्यांच्यासोबत होते या भेटीदरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकाशी संबंधित ही भेट होती असे पवारांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही पवारांनी त्यांना भेट म्हणून डाळिंब या भेटीतून कुठलाही राजकीय अर्थ निघू नये म्हणून ही भेट फक्त पाच मिनिटांचीच होती असे देखील शरद पवार म्हणाले’.
‘याला भेट, त्याला भेट दुसऱ्या दिवशी घरी थेट’..
एकीकडे दिल्लीच्या थंडीमध्ये शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण गरम झालेले असताना,आदल्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ही भेट घेतली. या भेटीवरून देखील राजकीय चर्चांना उधान आले आहे. ही भेट सदिच्छा भेट असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी देखील यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. शिंदे म्हणाले, यांची कारस्थाने जगजाहीर आहेत. नुकत्याच लोकसभा निवडणुकीत त्यांना जे यश मिळाले. त्याने ते हुरळून गेले. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना जे चित्र पहावे लागले. त्यामुळे आज ‘याला भेट, त्याला भेट दुसऱ्या दिवशी घरी थेट’ अशी स्थिती यांची झाली आहे. असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.