पुढच्या ७ दिवसांत देशात CAA लागू होणार? केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्यानंतर चर्चांना उधाण
![Shantanu Thakur said that CAA will be implemented in the country in next 7 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Shantanu-Thakur-780x470.jpg)
CAA Act | येत्या एका आठवड्यात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होईल, असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मी मंचावरून हमी देत आहे की, येत्या ७ दिवसांत केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात CAA लागू होईल, असं शंतनू ठाकूर म्हणाले. दरम्यान, शंतनू ठाकूर दक्षिण २४ परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत बोलत होते.
केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी दावा केला आहे की, येत्या एका आठवड्यात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केला जाईल. मी हमी देतो की, ७ दिवसांत CAA देशात लागू होईल, असे केंद्रीय मंत्री बंगालमध्ये म्हणाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा खरा होतो कि खोटा आता हे पाहावे लागेल.
हेही वाचा – खासदार इम्तियाज जलील यांचं वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले..
दरम्यान, या कायद्यानुसार, ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या गैर-मुस्लिम (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. सीएए डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने मंजूर केला होता. कायदा मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती.