भाजपा प्रवेशानंतर राघव चड्ढा यांना धक्का; २४ तासांत इन्स्टाग्रामवर १० लाख फॉलोअर्स घट

नवी दिल्ली | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) मोठा राजकीय हादरा बसला आहे. पक्षाचे तरुण चेहरा आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आपल्या सहकारी ७ खासदारांसह शुक्रवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मात्र, या राजकीय कोलांटउडीचा राघव चड्ढा यांच्या लोकप्रियतेला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. भाजप प्रवेशानंतर अवघ्या २४ तासांत त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे.
काही आठवड्यांपूर्वीच राघव चड्ढा यांची ‘आप’च्या राज्यसभा उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासूनच ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. शुक्रवारी या चर्चांना पूर्णविराम मिळाला, जेव्हा चड्ढा यांनी राज्यसभेतील ‘आप’च्या १० पैकी ६ खासदारांना सोबत घेऊन भाजपचे कमळ हाती धरले. या मोठ्या फुटीमुळे आम आदमी पक्षाचे वरिष्ठ सभागृहातील संख्याबळ कमालीचे घटले आहे.
हेही वाचा
‘भोंदू’ बाबावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घाला; रोहित पवार आक्रमक
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत राघव चड्ढा यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. शुक्रवारी त्यांच्या इन्स्टाग्रामवर सुमारे १४.६ मिलियन फॉलोअर्स होते. मात्र शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत ही संख्या घटून १३.५ मिलियन इतकी झाली, म्हणजेच जवळपास १० लाख फॉलोअर्स कमी झाल्याचे दिसून आले आहे.





