Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

व्यासपीठीवरील सावळ गोंधळ पाहून अजित पवार उठले अन्….

जालना : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जालना दौऱ्यावर आहेत. यावेळी व्यासपीठावरील सावळा गोंधळ पाहून अजित पवार भलतेच भडकल्याचे पाहायाला मिळाले. स्वतः स्टेजवरुन उठत डी झोनमध्ये उमेदवारांना येऊ देण्याची ताकीद त्यांनी यावेळी दिली त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

सभास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसवण्यासाठी खुर्च्या न दिल्याच्या कारणातून अजित पवारां संताप व्यक्त केला. व्यासपीठावरील सुरु असलेला सावाळ गोंधळ पाहता पुढे येत सावरण्याचा प्रयत्न केला. ते व्यासपीठावरून उठले आणि थेट हातात माईक घेऊन पोलिसांना झापलं आहे. तसेच स्टेजच्या समोरच्या बाजुला खुर्च्या लावून उमेदवारांना बसण्यासाठी व्यवस्था करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हेही वाचा –  राज्य मंडळाची प्रमाणपत्रे ऑनलाइन; विद्यार्थ्यांना दिलासा

व्यासपीठावरती सर्वजण बसलेले होते, माईकसमोर सूत्रसंचालक उमेदवारांची नावे जाहिर करत त्यांना स्थानपन्न होण्यास सांगत होता. , त्यावेळी अचानकपणे अजित पवार उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, मला पोलिसांना आणि सगळ्यांना सांगायचं आहे. माझे जे उमेदवार आहेत, त्यांच्या खुर्च्या इथे समोर व्यासपीठासमोर लावा. मी सांगतो आहे, घ्या त्या खुर्च्या आणि समोर लावा. काढा त्या खुर्च्या कार्यकर्त्यांनो उठा. काढा त्या खुर्च्या, कळतं नाही काय, उमेदवार कोण आहेत, त्यांना इथे समोर बसवा,ये इकडे लावा खुर्च्या, चला, इकडे, समोर लावा खुर्च्या, सगळे उमेदवार पुढे या, सांगितलेलं कळतं नाही काय, खुर्च्या घ्या पटापट असं म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button