Election Commission | आगामी विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर, ४ ऑक्टोबरला मतमोजणी

Election Commission | केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका तीन टप्प्यात होणार असून १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर, १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यातच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यांचा दौरा पूर्ण केला होता. त्यानंतर आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. दरम्यान गेल्या काही काळात जम्मू काश्मीरमध्ये १०० कोटी रुपये जप्त झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
महाराष्ट्राची निवडणूक का जाहीर केली नाही?
महाराष्ट्रात आता पाऊस पडला आहे. शिवाय गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळी असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा आत्ताच जाहीर केल्या नाहीत. परंतु कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूका जाहीर केल्या जातील, असं केंद्रीय निवडणुक आयोगाने सांगितलं.
हेही वाचा – ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा! वाचा कोणाला मिळाला कुठला पुरस्कार..
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक मतदानाची तारीख –
पहिला टप्पा- बुधवार १८ सप्टेंबर
दुसरा टप्पा – बुधवार २५ सप्टेंबर
तिसरा टप्पा – मंगळवार एक ऑक्टोबर
मतमोजणी- शुक्रवार चार ऑक्टोबर
हरियाणा विधानसभा निवडणूक मतदानाची तारीख –
पहिला टप्पा- मंगळवार एक ऑक्टोबर
मतमोजणी- शुक्रवार चार ऑक्टोबर





