ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातलं वातावरण प्रचंड तापलं

आज सकाळी 10.30 वाजता सर्वपक्षीय नेते हे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना भेटणार

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातलं वातावरण प्रचंड तापलं आहे.विरोधकांकडून सातत्याने याप्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं जात आहे. आता याप्रकरणी आज सर्वक्षीय शिष्टमंडळ हे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र देण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता सर्वपक्षीय नेते हे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळी असतील. भारतीय जनता पक्ष, पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते राज्यपालांना भेटणार आहे.

या हत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांत राज्यभरात अनेक आंदोलनं देखील होताना पहायला मिळाली. या हत्येचा आरोप असलेल्या 7 आरोपींपैकी सहा जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनाही आता सीआयडीने ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या सर्व हत्याप्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्यामागे असलेले त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षात सहभाग आहे, असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

आज सकाळी 10.30 वाजता सर्वपक्षीय नेते हे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळी असतील.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button