Pune Crime : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची दिवसा ढवळ्या हत्या..
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना
![Sarpanch of NCP was killed in broad daylight](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Praveen-Gopale-780x470.jpg)
पुणे : मावळ तालुक्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांचा अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सात च्या सुमारास ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची शंका वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, प्रवीण गोपाळे हे शिरगावाचे विद्यमान सरपंच म्हणून काही दिवसांपूर्वीच निवडून आले होते. चांगल्या मताधिक्याने चे विजयी झाले होते. प्रवीण गोपाळे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून शिरगाव चौकात कामानिमित्त आले होते. मात्र अचानक त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यातून त्यांनी पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच. पोलिस घटना स्थळी दाखल झाले. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.