संतोष देशमुख हत्या प्रकरणात, विष्णू चाटेनी दिली ही कबुली
कबुलीजबाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ
![Santosh Deshmukh, Murder, In Case, Vishnu Chate, Confession, Answer, Valmik Karad, Growth,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/santosh-deshmukh-1-780x470.jpg)
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, त्यांचा खून आणि पवनचक्की व्यवस्थापनाला दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहे. जनता आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे प्रकरणात पोलिसांना, सीआयडीला कारवाई करणे भाग पडले. 22 दिवसांपासून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या यंत्रणा हालल्या. आता दोन कोटींच्या खंडणीप्रकरणात विष्णू चाटे याने मोठी कबुली दिली आहे. या कबुलीजबाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काय दिली कबुली?
मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू होते. येथील पवनचक्की व्यवस्थापनाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात आरोपी विष्णू चाटे याने मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते. कराडचे अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणे झाल्याचे चाटे याने चौकशी दरम्यान कबूल केले. सीआयडीने याविषयीचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात हा खुलासा करण्यात आला. या सर्व अपडेटमुळे कराडचा पाय खोलात गेला आहे.