‘..तर तुम्ही दोन दिवस जेवू नका’; आमदार संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला!
![Santosh Bangar said that if parents do not vote for me, you should not eat for two days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Santosh-Bangar-780x470.jpg)
MLA Santosh Bangar | शिवसेना शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. अशातच संतोष बांगर यांचा चिमुकल्यांना अजब सल्ला दिल्याने संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेंत आले आहेत. तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असं अजब सल्ला त्यानी शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्याने बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
आमदार संतोष बांगर यानी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमदार संतोष बांगर शाळेतल्या चिमुकल्यांना म्हणाले की, तुमच्या आई-वडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करण्यास सांगा. नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका. तुम्ही जेवला नाहीत आणि आई-वडिलांनी विचारलं की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मी त्यानंतर जेवेन, असं ते म्हणाले. त्यानंतर बांगर यांनी तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार? असे प्रश्न वाचरले.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार, समाजाला पुन्हा नवे आवाहन!
कोवळ्या कोवळ्या निष्पाप मुलांना तुमचे आईबाप संतोष बांगर ला मतदान देत नाहीत त्यासाठी दोन दिवस उपाशी रहायला सांगतायत🥶@ECISVEEP @SpokespersonECI आतातरी तुम्ही कारवाई करणार कि नाही….???? @maha_governor काय चाललंय हे महाराष्ट्र मध्ये🤔 pic.twitter.com/MuZ9awXyMA
— Amit Talks😉 (@AmitTalkss) February 10, 2024
काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईन असं चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी दिलं आहे. याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असं बांगर म्हणाले आहेत.