‘नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेणार’; शिंदे गटातील नेत्याचं विधान
![Santosh Bangar said that if Narendra Modi does not become Prime Minister in 2024, he will hang himself at Bhar Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Narendra-Modi-1-780x470.jpg)
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून ठिकठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे.
आमदार संतोष बांगर म्हणाले, माझा जो शिवसैनिक आहे त्याला फक्त धनुष्यबान लागतो. कोणी म्हणेल आमच्याकडे मशाल आहे. कोणी म्हणेल आमच्याकडे हे आहे..ते आहे..याचा कोणताही फरक पडत नसतो. महाराष्ट्रातील जनता ही सुजान आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलं आहे की खरी शिवसेना कोणती. हिंदुत्ववादी संघटना कोणती.
हेही वाचा – ‘गाढवानं गाढवासारखा निकाल दिला’; ठाकरे गटाचा नार्वेकरांना खोचक टोला
प्रत्येकाला माहिती आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडुन द्यायचं आहे. छाती ठोकून सांगतो. २०२४ चा निकाल हा आमच्याच बाजूने लागेल. एप्रिलमध्ये आगामी लोकसभेची निवडणूक आहे. छाती ठोकून सांगतो, २०२४ ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भर चौकात फाशी घेईन, असंही संतोष बांगर म्हणाले.