अजितदादांना मोठा धक्का! संजोग वाघेरे शनिवारी ठाकरे गटात प्रवेश करणार
![Sanjog Waghere will join the Thackeray group on Saturday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sanjog-Waghere-780x470.jpg)
पिंपरी : अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे हे शनिवारी ३० डिसेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाकडून त्यांना मावळमधून उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. वाघेरे यांचा पक्षप्रवेश अजित पवार यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याबाबत नाराजी नाही. उमेदवारीची चर्चा झाली आहे. दोन दिवसात कळवितो असे सांगितले होते. शनिवारी प्रवेशासाठी बोलविले आहे. राजकारणात खूप पाठीमागे राहिलो. पुढे जाण्यासाठी निर्णय घेतला, असं संजोग वाघेरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – मुलींवरील अत्याचार, आत्महत्यांसाठी पालकही जबाबदार; रूपाली चाकणकर
संजोग वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे शहराचे महापौर होते. वाघेरे घराणे पवार कुटुंबाशी एकनिष्ठ होते. संजोग वाघेरे यांनी महापौर, राष्ट्रवादीचे अध्यक्षपद भूषविले होते. पक्षातील फुटीनंतर ते अजित पवार यांच्या गटात होते. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.