‘६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होणार’; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
![Sanjay Shirsat said that after June 6, incoming will start with us](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Eknath-Shinde-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. ६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात अनेकजण असल्याचं ते म्हणाले.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात अनेकजण आहेत. माझ्याही संपर्कात आहेत. आमच्याच नियमित चर्चाही होतेय. योग्यवेळेला योग्य निर्णय घेण्याची शिंदेंची स्ट्रॅटेजी आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील.
हेही वाचा – अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका
अजितदादांकडेसुद्धा अनेकजण येणार आहेत. कारण, आता शरद पवार गटाला कंटाळले आहेत. त्या गटात चाललेली हुकूमशाही, मीपणा आणि अहंभाव यामुळे आमदार कंटाळले. ते अजित दादांच्या संपर्कात आहेत, असंही संजय शिरसाट म्हणाले.