‘गाडीत १५ कोटी होते, फोन आला अन् एक गाडी सोडली’; संजय राऊतांचा आरोप

मुंबई | पुण्यातील खेड-शिवापूर भागात पोलिसांनी एका गाडीतून पाच कोटींची रोख रक्कम जप्त केले आहेत. ही गाडी एका सत्ताधारी आमदाराची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत म्हणाले, की पुण्यातील खेड-शिवापूर भागात दोन गाड्या होत्या. त्यामध्ये १५ कोटी रुपये होते. तुम्हाला माहिती असेल की, मी आआधी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ५०-५० कोटी रुपये देण्याचे काम करत आहेत. त्यातील हा १५ कोटींचा पहिला हप्ता जात होता. जी गाडी पकडली त्यामध्ये सांगोल्याच्या आमदारांसाठी पहिला हप्ता जात होता. त्यामध्ये ५ कोटींचा हिशेब लागला. त्यातील १० कोटी सोडून देण्यात आले. एक फोन आला त्यानंतर एक गाडी सोडून देण्यात आली.
हेही वाचा – ‘लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करा, १ कोटी मिळवा’; कोणी केली घोषणा?
कशाप्रकारे पैसा वाटप सुरु आहे, त्याच हे एक उदहारण आहे. ५ कोटी कोटी साधारण रक्कम नाही. १० कोटी सोडून दिले. मी त्याबाबत टि्वट केलय. १५ कोटींचा हिशोब होता. १५ कोटी पोहोचले, लवकरच ३० कोटी मिळणार. हे सर्व पैसे पोलीस संरक्षणात जातील. पोलीस, इन्कमटॅक्सकडून कुठलीही माहिती मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरुन एक फोन आला. संपूर्ण विषय संपवला, त्याचे पुरावे आहेत. लवकरच समोर येतील, असंही संजय राऊत म्हणाले.





