breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली’; संजय राऊतांचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली होती. माझी त्याबद्दल तक्रार नाही. मात्र, मला एक गंभीर बाब तुमच्या निदर्शानास आणून द्यायची आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूप व त्याच्या टोळीला माझी हत्या करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघता हा विषय आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे, असं खासदार संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनाही खासदार संजय राऊत यांनी पत्र लिहलं आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली होती. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंडांच्या टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत. मी याबाबत आपणास वेळोवेळी माहिती दिली आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे. ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर याला माझी हत्या करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button