Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर

Vladimir Putin | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवसांसाठी त्यांचा अधिकृत भारत दौरा निश्चित झाला असून परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक परिस्थिती आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने रशियन तेल आयातीवर टॅरिफ लादल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा भारत दौरा अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

हेही वाचा      :        स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय   

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करतील आणि त्यांच्या सन्मानार्थ राजकीय मेजवानी आयोजित करण्यात येईल. या दौऱ्यामुळे भारत–रशिया संबंधांचा प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच दोन्ही देशांच्या नेत्यांना विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button