Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सुनेत्रा काकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या; रोहित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन

पुणे | बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून, या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी निवडणूक बिनविरोध झाली नाही तर सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असे आवाहन रोहित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.

हेही वाचा     :            ‘जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज! कर्मकांडात अडकू नका’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रोहित पवारानी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत बारामतीकरांना आवाहन केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो, असे रोहित पवार म्हणाले आहेत. तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button