‘अजित पवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार’; रोहित पवार यांचं विधान चर्चेत
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंतच भाजप अजित पवार यांचं अस्तित्व ठेवणार आहे. तर आगामी निवडणुकीमध्ये अजित पवार यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.
रोहित पवार म्हणाले, रोहित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. भाजपच्या नेत्यांनी काही आदेश दिला असावा, तुम्ही काही आमदारांना अपत्र करा, असे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. असे म्हणत निवडणूक आयोग भाजपच्या हातातील एक बाहुली आहे, त्यामुळे आयोग कोणताच्या बाजून निर्णय देणार हे आपल्याला माहित आहे.
हेही वाचा – जमीन बक्षिसपत्र म्हणजे काय? ते कसे केले जाते? वाचा..
लोकसभा निवडणुकीपर्यंतच भाजप अजित पवार यांचं अस्तित्व ठेवणार आहे. तर आगामी निवडणुकीमध्ये अजित पवार यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.