breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

भारत महासत्ता होण्यासाठी संशोधन, नियोजन व देखभाल आवश्यक- पद्मश्री लीला पूनावाला

पिंपरी |

भारत देशाला जागतिक महासत्ता होण्यासाठी शेती, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात अभियांत्रिकीचा सहभाग वाढविला पाहिजे. तसेच अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये दीर्घ काळ उपयोगात येणारे, कमी खर्चात जास्त नागरिकांना लाभ मिळवून देणारे संशोधन झाले पाहिजे. त्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि देखभाल व दुरुस्तीही झाली पाहिजे असे मत पद्मश्री लीला पूनावाला यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या “केपीआयटी स्पार्कल २०२२” स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी (दि. २७ मार्च) पद्मश्री लीला पूनावाला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रिय शिक्षण मंत्रालयाचे मुख्य नवोपक्रम अधिकारी डॉ. अभय जेरे, केपीआयटीचे रवि पंडीत, अनुप साबळे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे आदी उपस्थित होते.

ही राष्ट्रीय स्पर्धा पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांपासून पीसीसीओई व केपीआयटी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत देशभरातून ८०० अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५००० विद्यार्थ्यांच्या १३०० संघांनी आपल्या संकल्पना सादर केल्या यामधून २४ संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. यामध्ये टिम एलेस्पा यांनी दहा लाखांचे, टिम किसान कनेक्ट पाच लाखांचे, टिम इलेक्ट्रोफीन पंचवीस लाखांचे, टिम युनॅनिमस ४ – वीस लाखांचे आणि टिम द्रव्या यांनी दहा लाखांचे रोख पारितोषिक जिंकले.

या राष्ट्रीय स्पर्धेच्या परिक्षक मंडळात ए.एस. रविकुमार, डॉ. मिलिंद राणे, डॉ. डी. मोहनलाल, बालकृष्ण महाजन, डॉ. सिध्दार्थ मुखोपाध्याय, डॉ. संजीव कट्टी, डॉ. सोमनाथ सेनगुप्ता, अनुपम जलोटे, पी.एस. कानन, पौल संजय, पोयनी भट्ट, सुनिल मोटवानी, सलीम हुझेफा, अनुराग पांडे, दिपेश गुजराथी आणि रत्नाकर देशमुख या तज्ञ व्यक्तींचा समावेश होता.

  • पारितोषिक मिळवलेले संघ खालील प्रमाणे…

१) टीम एलेस्पा –  डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (पुणे), संदिप विद्यापीठ, (नाशिक), कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, (पुणे) आणि जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, (पुणे) यांचा संयुक्त प्रकल्प आहे. यांनी परफॉर्मन्स मॉनिटरिंग सिस्टमसह बॅटरी चार्जिंगचा वेळ, रेंज, चार्जिंगची कमतरता या समस्या सोडवणारे ऍडव्हान्स ऑटोमेटेड हायब्रीड इलेक्ट्रिक वाहन डिझाइन केल्याबद्दल १० लाख रुपयांचा प्लॅटिनम पुरस्कार जिंकला आहे.

२) टीम किसान कनेक्ट – एस.जी. बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेळगावच्या टीम किसान कनेक्टने ईव्ही ट्रॅक्टरसाठी मल्टि-फंक्शनल रेट्रोफिट (जे सर्व संलग्नकांना एकत्रित करू शकतात) डिझाइन केल्याबद्दल ५ लाख रुपयांचा सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे.

३) टीम इलेक्ट्रोफीन – कोईम्बतूर येथील श्री कृष्णा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील टीम इलेक्ट्रोफीनने दुचाकीसाठी हायड्रोजन, जीवाश्म इंधन आणि इलेक्ट्रिक आधारित तीन इंधन सिस्टिम डिझाइन केल्याबद्दल अडीच लाख रुपयांचा रौप्य पुरस्कार जिंकलेला आहे.

४) टीम यूनॅनिमस ४ – अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी कार्ये करू शकणारे मल्टिपर्पज कृषी इलेक्ट्रिक वाहन डिझाइन केल्याबद्दल पुण्यातील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीम यूनॅनिमस ४ – यांनी अभिनवी १ पुरस्कार आणि दोन लाख रुपयांचे रोख पारितोषिक जिंकले आहे.

५) टीम द्रव्या – पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे यांच्या टीम द्रव्याने फोर्स्ड एअर कूलिंग आणि अप्रत्यक्ष लिक्विड कूलिंगऐवजी बॅटरीचे तापमान कमी करण्यासाठी डायलेक्ट्रिक फ्लुइड वापरणारी बॅटरी कूलिंग सिस्टीम डिझाइन केल्याबद्दल अभिनवी २ पुरस्कार आणि एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक जिंकले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button