breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

साठेखत, कुलमुखत्यारपत्र दस्तांच्या नोंदणीला सह दुय्यम निबंधक कार्यालयाचा नकार?

  • अ‍ॅड. थोपटे यांनी माहिती अधिकारात मागवली माहिती…
  • नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून असा कोणताच आदेश नसल्याचा निर्वाळा…

भोसरी |

सह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये साठेखत, कुलमुखत्यारपत्र आदी दस्तांची नोंदणी करण्यास नकार दिला जात आहे. याबाबत अ‍ॅड. बाळासाहेब थोपट यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये दस्त नोंदणी न करण्याबाबतचे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून कोणतेही आदेश दिले नसल्याचे उघड झाले आहे. अ‍ॅड. थोपटे यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती. पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील सह दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये साठेखत व कुलमुखत्यारपत्राच्या दस्त नोंदणी सध्या बंद असल्याचे त्यांनी याबाबत दिलेल्या अर्जात म्हटले होते.

साठेखत व कुलमुखत्यारपत्र दस्ताच्या नोंदणी बंदबाबत पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्या कार्यालयाकडून कधी आदेश दिलेले आहेत. तसेच, कधीपर्यंत बंद राहणार आहे, याची माहिती मिळावी, असे त्यांनी या अर्जात म्हटले होते. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून ६ एप्रिल रोजी माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार साठेखत व कुलमुखत्यारपत्रांची दस्त नोंदणी रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचे नमूद आहे. त्याचा संदर्भ देत अ‍ॅड. थोपटे यांनी म्हटले आहे की, संबंधित दस्तांची नोंदणी बंद करण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून कोणतेही आदेश नसताना सह दुय्यम निबंधक दस्त नोंदणीस नकार देत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button