देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी!
आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर उतरले रस्त्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Sunil-Shelke-2-780x470.jpg)
पद नाही तर विश्वास आयुष्यभर टिकतो : सुनील शेळके
देहूगाव | देहूगाव येथे केलेल्या विविध विकास कामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार शेळके यांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद मिळाला. आमदार शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर रस्त्यावर उतरल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
आमदार शेळके यांनी रविवारी दुपारी देहूगाव चा प्रचार दौरा करीत मतदारांशी संवाद साधला. यावेळी सजवलेल्या बैलगाडीतून शेळके यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील विविध भागात त्यांनी केलेल्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्यावेळी देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, माजी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विवेक काळोखे, बांधकाम समिती सभापती योगेश काळोखे, पाणीपुरवठा समितीचे सभापती सुधीर काळोखे तसेच नगरसेवक, महायुतीतील घटक पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व देहूकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘राज ठाकरेंच्या मनात काय ते मला कळलंच नाही’; सदा सरवणकर यांचं वक्तव्य
देहूकर नागरिकांनी आतापर्यंत भरभरून प्रेम दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आमदार शेळके म्हणाले की, सत्ता आणि पद येते-जाते पण जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला व यापुढेही करत राहीन. माझ्यावर देहूकारांनी दाखवलेल्या विश्वासाला मी आयुष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही.
देहूगावचा सर्वांगीण विकास हेच आपले ही असून नगरपंचायतीबरोबरच शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला. देहूगावात झालेला बदल, झालेला विकास याची आपण साक्षीदार आहात. त्या विकासाची पावती, माझ्या प्रामाणिक कामाची पावती या निवडणुकीत मला भरघोस मते द्याल, असा विश्वास वाटतो,अशी शेळके म्हणाले.
‘आमचे मत विकासाला, महायुतीच्या सुनील अण्णांना’, ‘सुनील आण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘महायुतीचा विजय असो’, अशा घोषणा देत उपस्थित जनसमुदायाने आमदार शेळके यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.