अजितदादांना सोबत घेत भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली; संघाने भाजप नेत्यांना सुनावले खडेबोल
![Ratan Sharda, a member of Rashtriya Swayamsevak Sangh, said that the BJP has reduced its brand value by bringing Ajit Dada along.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-and-Ajit-Pawar-1-780x470.jpg)
मुंबई | लोकसभेचा निकाल लागून आठवड्याभराचा कालावधी होत नाही तेवढ्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य रतन शारदा यांनी ‘मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’ या ऑर्गनायझरच्या लेखातून भाजपावर टीकेची झोड उठविली आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराक असल्याचे ऑर्गनायझर लेखात म्हटले आहे.
ऑर्गनायझरच्या लेखात काय म्हटलं?
महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य हे भाजपाचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत. स्वंयसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले.
हेही वाचा – ‘शरद पवारांना सोडलं तर माझी बायको..’; खासदार बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया
लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल भाजपा कार्यकर्ता आणि नेत्यांना वास्तवाचे भान आणून देण्यास पुरेसे आहेत. भाजपा नेत्यांना हे कळले नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पार ची दिलेली घोषणा हे त्यांचे ध्येय आहे. विरोधकांचे नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.