breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राजकोट किल्ल्यावर ठाकरे विरुद्ध राणे मध्ये जोरदार राडा, जोरदार घोषणाबाजी

Malvan | मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत यांचा समावेश आहे. मात्र, याचवेळी भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणेही त्या ठिकाणी आले. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या दरम्यान दोन्ही गटांमध्ये राडा झाला.

आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवलं. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिसांनी सक्त ताकीद दिली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येत आहेत. हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही, असे निलेश राणे म्हणाले.

हेही वाचा    –     भोसरी विधानसभा क्षेत्रात आणखी एक अग्निशामक केंद्र! 

खासदार नारायण राणेंनीही प्रतिक्रिया दिली. यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असेल. त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button