‘..अशा व्यक्तीला तातडीने तुरूंगात टाका’; रामदेव बाबांची मागणी
![Ramdev Baba said that Brijbhushan Singh should be jailed immediately](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Ramdev-Baba--780x470.jpg)
मुंबई : भारतीय महिला कुस्तीपटूंचे जंतरमंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंकडून केली जात आहे. दरम्यान, यावरून पतंजलीचे योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदेव बाबा म्हणाले की, देशाचे कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर व्यभिचार, लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ही फार लाजिरवाणी बाब आहे. अशा व्यक्तीला तातडीने अटक करून तुरूंगात टाकायला हवं. तो रोज आपल्या आई-बहिणींविषयी, मुलींविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहे. हे निषेधार्ह आहे. पाप आहे.
हेही वाचा – नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल..
तीन महिन्यांपूर्वी या महिला कुस्तीपटू आणि त्यांना पाठिंबा देणारे पुरूष कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले होते. एक आठवड्यातून जास्त काळ आंदोलन चालल्यानंतर अखेर सरकारने यासंदर्भात समिती नेमून चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचं पाहून पुन्हा एकदा महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.