breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंची रणनीती ठरणार? उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्याला करणार सुरुवात

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून मतदारसंघाचा अंदाज घेतला जाणार आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे. येत्या 4 ऑगस्टपासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रवाना होणार असून या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथे होणार आहे. यानिमित्त विधानसभा निवडणुकीची  रणनीती ठरली जाण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे 4 ऑगस्ट पासून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. हा दौरा 13 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे. या दौऱ्यात ते संबंधित जिल्हातील निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज ठाकरे 4 ऑगस्टला सोलापूर, 5 ऑगस्टला धाराशिव, 6 ऑगस्टला लातूर, 7 ऑगस्टला नांदेड.

हेही वाचा –  सरकार पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

तर 8 ऑगस्टला हिंगोली, 9 ऑगस्टला परभणी, 10 ऑगस्टला बीड, 11 ऑगस्टला जालना, 12 आणि 13 ऑगस्टला ते संभाजीनगरला असणार आहेत. त्यानंतर या दौऱ्याची सांगता होणार आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे हे पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेतील तसेच निरीक्षकांनी ज्या मतदार संघाची चाचपणी करून त्या दृष्टीने चर्चा करतील.

दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार असून लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण, विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या अनुषंगाने राज ठाकरे यांनी तयारीला सुरूवात केली आहे. विधानसभेसाठी महायुती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सोबतच बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पार्टी आणि आता मनसेसुद्धा मैदानात उतरत आहे. त्यामुळे विविध मतदार संघात तगडी लढत पाहायला मिळू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button